Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात पुढील ४८ तास महत्वाचे

पुन्हा धुवांधार पावसाची शक्यता

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 8 ऑक्टोबर :- राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता परतीचा मार्ग धरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस झाला. शुक्रवारी देखील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. हाच पाऊस आता पुढच्या दोन-तीन दिवस राहणार असल्याची माहिती आहे.

इतकंच नाही तर राज्यासाठी पुढचे ४८ तास महत्त्वाचे असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढच्या ४८ तासांत मुंबईसह इतर महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथावर मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगर आणि आजूबाजूच्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.