Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मॅनहोल्सच्या स्वच्छतेसाठी रोबोट सज्ज

नागपूर स्मार्ट सिटीच्या रोबोटचे आयुक्तांनी केले निरीक्षण, स्वच्छ आणि सुंदर नागपूर कडे मनपाचे आणखी एक पाउल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर, 18,ऑक्टोबर :- शहरातील मॅनहोल्सची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी आणि कर्मचार्यांना सीवरलाईनच्या मॅनहोलमध्ये प्रवेश न करता आणि सुरक्षितपणे स्वच्छता करण्याकरीता प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून मॅनहोल्सच्या स्वच्छतेसाठी नागपूर स्मार्ट सिटीच्या भाडेतत्वावर घेण्यात आलेले रोबोट सज्ज झाले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सोमवारी रोबोटद्वारे केल्या जाणार्या स्वच्छतेचे निरीक्षण केले. यावेेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. गजेंद्र महल्ले, स्मार्ट सिटी चे मोबिलिटी विभागाचे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, ई-गव्हर्नन्स विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले, पर्यावरण विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणिता उमरेडकर, डॉ. पराग अंर्मज, कुणाल गजभिये आदि उपस्थित होते. नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने अत्याधूनिक रोबोट मशीन भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. या रोबोट मशीनमुळे नागपूर शहरातील स्वच्छता कर्मचार्यांच्या समस्यांवर दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  चिन्मय गोतमारे यांनी सांगितले की, सध्या मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग कायदा 2013 च्यानुसार मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेकडे १० जेट्टींग मशीन आणि ४ सक्शन (suction) मशीन आहेत. त्याच्या सहाय्याने मोठ्या रोडवर सिवर चेंबरची स्वच्छता करण्यास मदत होते. पण लहान रोडवर हे करणे अडचणीचे ठरते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत होणार आहे. आय.ओ.टी.वर आधारित हे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग रोबोट लहान रस्त्यावर किंवा गल्ल्यांमध्ये सुद्धा सिवर चेंबरच्या स्वच्छतेत मदत करेल, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय हा पायलट प्रकल्प असून, समाधानकारक काम आढळ्यास महानगरपालिका अधिक प्रमाणात रोबोट घेण्याचा विचार करेल. हे रोबोट जेनोरोबोटिक्स कंपनी कडून भाडेतत्वावर घेण्यात आले असून, नागपूर स्मार्ट सिटीतर्फे या कंपनीला प्रत्येकी रोबोटच्या मागे सात लाख रुपये भाडे निश्चित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रोबोटला कॅमेरा व हात

शहरातील मॅनहोल्सच्या स्वच्छता आणि देखभाली साठी घेण्यात आलेल्या सदर विद्युत रोबोटला कॅमेरा व यांत्रिकी हात आहेत. रोबोट साधारणतः १० मीटर खोल जाऊन मॅनहोल स्वच्छ करू शकतो. स्वच्छ भारत मिशन २.० मध्ये केंद्र शासनाने मॅनहोलच्या स्वच्छतेसाठी मनुष्य ऐवजी मशीनचा वापर करण्याचा संकल्प केला आहे. स्वच्छ आणि सुंदर नागपूरच्या दिशेने हे मनपाचे उत्तम पाऊल आहे. केरळच्या स्टार्ट अप कंपनीतर्फे हा bandicoot रोबोट तयार करण्यात आला असून, या आविष्काराला पुरस्कार मिळाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

मशाल घरोघरी पोहचविण्याची ठाकरे गटाला संधी

सावळ्या गोंधळामुळे गाजली पालघरची मतमोजणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.