Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर संविधान दिन साजरा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

गडचिरोली : दि .26 नोव्हेंबर: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आज दि 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर खासदार अशोक नेते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व हार अर्पण करून त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम , जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, जिप च्या समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडाप, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली तालुका संपर्क प्रमुख विलास पाटील भांडेकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, कारागीर आघाडी चे माजी उपाध्यक्ष राकेश राचमलवार, श्यामजी वाढई, व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.