Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्यासाठी मेथी अधिक फायदेशीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 28 ऑक्टोबर :- पालकपेक्षा मेथीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळेच मेथी खाणे हाडांच्या आरोग्यसाठी ही फायदेशीर मानले जाते.

हवामान बदलानंतर नागरीकांच्या आहारातही बदल होतो. जसे आता हिवाळा सुरू होणार आहे. हा ऋतु सुरू होताच नागरीक जास्त पालेभाज्या खायला सुरूवात करतात. मात्र कोणती पालेभाजी आपल्यासाठी योग्य हे खुप लोकांना माहित नसते. या ऋतूत लोकांना पालक आणि मेथी खायला आवडते. पालक आणि मेथी या दोन्ही पालेभाज्यांचे वेगवेगळे फायदे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जीवनसत्वे आणि खनिजे समृध्द असलेल्या मेथीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खुपच कमी असते. मेथीचा वापर केल्याने रक्तातील सारखेची पातळीही कमी होते. शिवाय मेथीमुळे रोगप्रतिकार शक्ती ही मजबूत होते. हिवाळ्यात मेथी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

पालकमध्ये पोषक तत्व अधिक असतात. जेव्हा कोणाला आयरनची कमतरता असते तेव्हा पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण पालकमध्ये भरपुर प्रमाणात आयरन असते. पालकमध्ये फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडंट्स ही भरपूर असतात. इतकेच नाही तर पालकमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के सारखी अनेक खनिजे आणि जीवनसत्वे आढळतात, जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरतात. पालकमध्ये असलेले पोषक तत्व तुमचे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात तर बध्दकोष्ठता आणि कॅन्सर सारख्या समस्या दूर ठेवण्यासाठी देखील पालक उपयुक्त आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोणती भाजी खाल्ली पाहिजे?

ज्या लोकांना रक्त पातळ होण्याची समस्या आहे, त्यांनी पालक खाणे टाळावे. पालक रक्त गोठवण्यास मदत करते. तसेच मधुमेही रूग्णांनी डाक्टरांच्या सल्ल्याशिवाय पालक खाउ नये.

जर तुम्ही कमी कॅलरी आहार घेत असाल तर पालक ऐवजी मेथी खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. पालकपेक्षा मेथीमध्ये कार्बचे प्रमाण कमी असते तर प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. 100 ग्रॅम मेथीमध्ये 2.9 ग्रॅम कर्बोदके आणि 4 ग्रॅम प्रथिने असतात तर 100 ग्रॅम पालकमध्ये 6 ग्रॅम कार्ब आणि 2 ग्रॅम प्रथिने आढळतात. पालकपेक्षा मेथीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळेच मेथी खाणे हाडांच्या आरोग्यसाठी ही फायदेशीर मानले जाते.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.