Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रांजणगाव येथील इलेक्ट्राॅनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्पला केंद्र सरकारकडून मान्यता

महाराष्ट्र सरकारला मिळाला मोठा दिलासा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 31 ऑक्टोबर :- राज्याचे मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा करून रांजणगाव येथील इलेक्ट्राॅनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्पला मान्यता दिली आहे. फाॅक्सकाॅन वेदांता आणि टाटा एअरबस सारखे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याने शिंदे सरकार वर विरोधकांकडून जोरदार टीका-टीप्पणी होत आहे. त्यामुळे रांजणगाव इलेक्ट्राॅनिक हब बनविण्यासाठी केंद्राने 500 कोटी रूपयांच्या मेगा प्रकल्पाला मंजूरी दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात नव्याने येणारे तीन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राजकीय वातावरण गरम आहे. मात्र केंद्र सरकार ने महाराष्ट्रात इलेक्ट्राॅनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रोजेक्ट अंतर्गत नविन प्रकल्प येणार असल्याची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील टप्पा क्रमांक 3 अंतर्गत कर्डे येथे 300 हेक्टर वर हे नविन प्रकल्प येत आहेत. इलेक्ट्राॅनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ने 2000 कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून येत्या काही वर्षात हजारो नोकर्या निर्माण करण्याची क्षमता येथे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रांजणगाव (महाराष्ट्र) तामिळनाडू, नोएडा आणि कर्नाटक सारखे राज्य इलेक्ट्राॅनिक्स हब म्हणून उदयास येणास तयार आहेत. ईएमसीच्या विकासासाठी एकुण खर्च 492.85 कोटी रूपये आहे. त्यापैकी 207.98 कोटी रूपये भारत सरकार आणि उर्वरित 284.87 कोटी रूपयांचे योगदान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, राज्य औद्योगिक एजन्सीद्वारे दिले जाईल.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.