Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समाज मंदिराचा उपयोग सामजिक कार्यासाठी करावे

जिपचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, आलापल्ली येथे बौध्द विहार समाज मंदिराचे भूमिपूजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी,  31 ऑक्टोबर :-  समाज मंदिराचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करावा असे प्रतिपादन जिप चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. आलापल्ली येथे बौध्द विहार समाजच्या मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

आलापल्ली येथील बौध्द विहार येथे समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण येत होती. जिप चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार अध्यक्ष असतांना गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावर कंकडालवार यांनी 15 व्या वित आयोगातून निधी उपलब्घ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे निधी प्राप्त होताच प्राधान्याने हे काम मंजूर करण्यात आले असून अजय कंकडालवार यांच्या हस्ते बौध्द विहार समाज मंदिर कामचे भुमिपूजन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण चे अध्यक्ष भीमराव झाडे, तालुका अध्यक्ष बी.एम. दुर्गम, डा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष कार्तिक निमसरकार, ग्रापं सदस्य सुमन खोब्रागडे, सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.