Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अभिनेत्री रंभाच्या गाडीचा अपघात, मुलगी जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 01 नोव्हेंबर :-  बाॅलीवूड अभिनेत्री रंभा हिच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात रंभाची मुलगी जखमी झाली आहे. या अपघातात अभिनेत्री रंभाची कार चकनाचूर झाली आहे. कारमध्ये अभिनेत्रीची मुले आणि त्यांची आया ही उपस्थित होत्या. सुदैवाने मुलीला सोडून बाकी सर्वजण किरकोळ जखमी झाले आहे.

अभिनेत्री रंभा ने कार अपघाताची धक्कादायक बातमी तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने अपघाताचे फोटोही शेअर केले आहेत. फोटोवरून अपघात किती भीषण होता हे लक्षात येते. अपघातात कारच मोठ नुकसान झाले आहे. तीने तिच्या पोस्ट मध्ये लिहले आहे की मुलांना शाळेतून घरी घेउन येत असतांना आमची कार दुसर्या कार ला धडकली. माझ्यासोबत माझी लहान मुलं आणि त्यांची नॅनी होती. अपघातात आम्ही सर्व सुरक्षित आहोत. आम्हाला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, माझी छोटी मुलगी साशाला दुखापत झाली असून ती हाॅस्पिटलमध्ये आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रंभाच्या पोस्टवर कमेंट करून, सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूर केली आहे. तसेच मुलीला लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत आहे. तसेच या कठीण काळात खंबीर राहण्याचा सल्ला ही देत आहे. दरम्यान, अभिनेत्री रंभा सध्या फिल्मी दुनियेपासून दूर असली तरीपण एकेकाळी बाॅलिवूडच्य प्रसिध्द अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होता. नव्वदच्या दशकात आपल्या बाॅलिवूड करिअरमध्ये रंभाने अनेक गाजलेल्या चित्रपटामध्ये काम केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.