Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती गठीत 

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 01 नोव्हेंबर :-  महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम,2013 च्या कायदयाची परिणामकारक व योग्य अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दिनांक 28 जून 2022 अन्वये विभागीय आयुक्त (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावरील जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती (DivPIMC Divisional Programme Implementation and Monitoring Committee DivPIMC) स्थापन करण्यात आलेली आहे.

सदर समितीमध्ये एका विभागीय समन्वयकाची नेमणूक करावयाची आहे. त्यासाठी जादुटोणा विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मुलन या क्षेत्रात काम करणाऱ्या (किमान पाच वर्ष अनुभव असलेल्या) इच्छुक व्यक्तींनी दिनांक 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग,नागपूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,शासकीय आय.टी.आय. समोर, श्रध्दानंदपेठ,नागपूर-440022 या पत्यावर अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त,डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.