Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कलरफुल लव्हस्टोरी असणारा ‘दिल बेधुंद’ चित्रपटाचे टायटल पोस्टर प्रदर्शित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  02 नोव्हेंबर :- प्रेम हा एक असा विषय आहे, ज्याचे कितीही पैलू चित्रपटाद्वारे सादर केले तरी त्यातील नावीन्य तसूभरही कमी होत नाही. अशीच एक नवीकोरी कलरफुल लव्हस्टोरी असलेला ‘दिल बेधुंद’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच टायटल प्रदर्शित करण्यात आले.

ओसिअस कव्र्हज एन्टरटेन्मेंटचे शिवम पाटील यांची निर्मिती आणि संतोष फुंडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात नावीन्यपूर्ण आणि आजवर चित्रपटांमध्ये दाखवलेल्या प्रेमकथा पेक्षा वेगळे आणि बेधुंद करणारे असे काहीतरी पहावयास मिळणार असल्याची झलक टायटल पोस्टरमधुन मिळते. ही प्रेमकथा प्रेमातील गुलाबी रंगाची उधळण तर करीलच पण त्यासोबतच अंतर्मुख होउन विचारही करायला लावेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.