Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एटीएम अदलाबदली करून फसवणूक करणार्या आरोपीस अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नालासोपारा, 04 नोव्हेंबर :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून एटीएम मशीन मधून पैसे काढून देण्याच्या मदतीचा बहाणा करून हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणार्या सराईत आरोपीस गुन्हे शाख कक्ष 3 विरार शाखेच्या पोलीसांना यश मिळाले आहे. मोहम्मद आरीफअली शेख (48) रा. शक्कर मोहल्ला नालासोपारा पश्चिम यांस अटक करून त्याच्या जवळून विविध बॅंकेचे 21 एटीएम कार्ड व मोटरसायकल असा एकुण 65 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा कक्ष 3 विरार शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रित विश्लेषण व गुप्त बातमीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी मोहम्मद आरीफअली शेख यांस 1 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेउन चैकशी केली असता त्याच्या जवळून विविध बॅंकेचे 21 एटीएम कार्ड व मोटरसायकल असा एकुण 65 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदरची कार्रवाई पोलीस उपआयुक्त विजयकांत सागर, सहा. पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा कक्ष 3 चे पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनि शिवाजी खाडे, अशोक पाटील, मुकेश तटकरे, सागर बारवकर, सुचित घेरे, अश्विन पाटील, प्रविण वानखेडे यांनी केली.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.