Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्याला वरदान आहे ‘मनुका’

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 05 नोव्हेंबर :- ‘मनुके’ आवडत नाही असे म्हणणारे फार कमीजण आहेत. काहीसा गोड, काहीसा आंबट असा हा सुक्या मेव्यातील एक प्रकार. गोडाच्या पदार्थामध्ये वापर करण्यापलीकडे ही मनुक्यांचा वापर केला जातो. आरोग्याच्या दृष्टी ने सुध्दा त्यांचे बरेच फायदे आहेत. इवलेसे मनुके योग्य पध्दतीने खाल्ल्यास त्यामुळे गंभीर आजारांपासून दूर राहणे ही सहज शक्य होते. मनुक्यांचा वापर औषधांसाठी केला जातो.

मनुक्यांचा एक असा प्र्रकार आहे ज्यामध्ये बर्याच सकारात्मक गोष्टी दडलेल्या आहेत. अनेकजण त्याला मनुक्का असेही म्हणतात. हा मनुक्का सुध्दा द्राक्ष वाळवूनच तयार केला जातो. पण ही द्राक्ष आकाराने मोठी असतात. त्यांचा वापर औषधांमध्ये ही केला जातो. चवीला ते अतिशय गोड असतात. या मोठ्या मनुकांमुळे पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे अपचन, गॅस, आम्लपित्ताचा त्रास नाहीसा होतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मनुक्यांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे रक्तवाहिन्यांचा तणाव कमी करण्यास यामुळे मदत होते. यामुळे उच्च रक्तदाब ही नियंत्रणात राहतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या संशोधनातून मनुक्यांमध्ये असणार्या कॅटेचिन आणि केम्पफेरोलमुळे कॅन्सर वर मात करण्यासही त्यांची मदत होते. मनुके पाॅनीफेनोलिकचा एक उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे डोळ्यांना आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व मिळतात. मनुक्यांच्या सेवनामुळे तुम्ही ग्लुकोमा, रातांधळेपणा आणि मोतीबिंदू पासून दुर राहू शकता. शारिरीक बळकटीसाठी मनुक्यांच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

सुदृढ व्यक्तीने दिवसभरात 5-6 मनुके खावेत. रात्री मनुके पाण्यात भिजत घालून सकाळी त्यांचे सेवन करावे. रात्री अर्धा ग्लास दुधातही मनुके भिजत घालून त्याचे सेवन करणे फायद्याचे, यामुळे पचनशक्ती सुधारते. मनुके तुम्ही संध्याकाळच्या वेळीही खाउ शकता. यामुळे हाडे मजबूत होतात. संध्याकाळच्या वेळी खाणे खाण्यापेक्षा स्नॅक्स म्हणून तुम्ही काळ्या मनुका सकाळी दह्यात भिजवून घालत त्यांचे सेवन संध्याकाळच्या वेळात करू शकता. दह्यामुळे मनुक्यांची पोषक तत्व आणखी वाढतात. याद्वारे पोटही भरते आणि जीभेचे चोचलेही पुरवले जातात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.