Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विशाल भारद्वाज यांचा आगळा वेगळा थ्रिलर ‘कुत्ते’ येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 08 नोव्हेंबर :- विशाल भारद्वाज एक प्रसिध्द आणि उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून बाॅलीवूड मध्ये ओळखले जातात. नेहमी नवीन कथा ते लोकांसमोर आणतात. केवळ दिग्दर्शनच नाही तर संगीत दिग्दर्शनात ही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांचे चित्रपट आणि गाणी प्रेक्षकांना चांगलेच पसंतीत पडतात. आता विशाल भारद्वाज हे असाच एक आगळा वेगळा थ्रिलर चित्रपट घेउन येत आहेत. ‘कुत्ते’असे या चित्रपटाचे नाव आहे. मध्यंतरी या चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित झाले होते. आणि त्यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. या पोस्टरमध्ये कुत्र्यांचे डोक आणि खालचे शरीर हे माणसाचे दिसत होते. हे वेगळे आणि मजेशीर पोस्टर पाहुन प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली होती. आता नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शनी ची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

दिग्दर्शक लव रंजन यांच्या प्रोडक्शन कंपनीच्या व्टिटर अकाउंटच्या माध्यमातून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. थरार आणि मनोरंजनाने भरपूर असलेल्या कुत्ते या चित्रपटात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरूद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज अशा प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. तसेच ‘कुत्ते’ हा एक केपर थ्रिलर असून विशाल भारद्वाज यांच्या मुलगा आसमान भारद्वाज या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. आसमानचा हा पहिलाच चित्रपट आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

13 जानेवारी 2023 ला ‘कुत्ते’ सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आसमान आणि विशाल भारद्वाजद्वारा लिखित हा चित्रपट डार्क-काॅमेडी असून आपल्या पोस्टर लाॅंचने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले आहे तर गुलजार यांनी या चित्रपटाची गाणी लिहली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.