Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 08 नोव्हेंबर :-  माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय दापोली सिसोर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माजी मंत्री अनिल परब यांच्यासह तिघांवर आयपीएस कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखी झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली है।

फसवणूक आणि आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. मंत्रिपदाचा दुरूपयोग कर शेतजमीनीवर तीन मजली रिसॉर्ट बांधल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. तसेच हे बांधकाम करतांना रोक रक्कम वापरण्यात आल्याचा संशय ही सोमय्या यांनी बोलून दाखवला होता. शेतजमीनीचे बिगर शेती जमीनीत रूपांतर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परब यांनी कदम यांना हे रिसॉर्ट विकल्याचा आरोप ही सोमय्या यांनी केला आहे. दरमियान हे रिसॉर्ट आपले नाही असे अनिल परब यांनी वारंवार सांगितले आहे. मात्र, आता परब यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.