Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताईंची जाहीर माफी मागावी – शाहीन हकीम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 08 नोव्हेंबर :- राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सासंदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या बाबत आक्षेपार्ह उदगार काढले, त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असे वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी काढले आहे. त्यामुळे त्यांनी खासदार सुप्रिया यांची जाहीर माफी मागावी अन्यथा भव्य आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

महाराष्ट्र राज्याची संस्कृती ही महिलांना सन्मान देणारी असून अब्दुल सत्तार संपूर्ण स्त्री शक्तीचा अपमान केला आहे. अब्दुल सत्तार हे इस्लाम धर्मातील असून इस्लाम धर्मात स्त्रियांना सन्मान दिला जातो. मात्र, अब्दुल सत्तार हे विसरले आहे. ज्या प्रमाणे त्यांनी गैर मार्गाने हे सरकार स्थापन केले आहे त्याच प्रमाणे गैर मार्गाने वक्तव्य करणे हे त्यांना न शोभनारे असून बेशर्मी ची हद्द पार करणारे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी नागपूर विभागातर्फे सर्व महिला अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करतो आणि अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांची जाहीर माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी नागपूर विभाग गप्प बसणार नसून त्यांच्या विरोधात भव्य आंदोलन करण्याचां इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचे नागपूर विभागीय अध्यक्ष शाहीन जमीर हकीम यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.