Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 14 नोव्हेंबर :-  मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे काल रात्री उशिरा निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. मराठी सोबतच हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या भुमिका साकारल्या आहेत. सरफरोश, गांधी आणि वास्तव सारख्या सिनेमांमधून त्यांनी केलेली भुमिका प्रेक्षकांना खुप आवडली होती. काल रात्री त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यामुळे त्यांना अंतर्गत रक्तस्त्राव होउन रात्री 1 च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहे. मुंबईतल्या पारशीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.