जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून नंदिनी खांडरे हिच्या परिवाराला उपचारासाठी करण्यात आली आर्थिक मदत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी 28 नोव्हेंबर :- अहेरी तालुक्यातील आलापली येथील नंदीनी खांडरे हिची प्रकृती बरी नसल्याने दत्तामेघे दवाखाना सावंगी (मेघे)येथे भरती करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. मात्र त्यांच्या परिवाराची परिस्थिती हलाखिची असल्याने उपचारासाठी आर्थिक चनचन जाणवत आहे. त्यामुळे सदर मुलीची आई अर्चना संतोष खांडरे हिने जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडे मदत मागितले असता. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,आलापली ग्रा.प.माजी सदस्य, सलीम शेख,वसंत आलाम,आविसचे शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार,राकेश सड़मेक,प्रकाश दुर्गे आदि उपस्थित होते.
Comments are closed.