Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भोकर तालुक्यात शिवसेनेतर्फे निषेध आंदोलन…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भोकर, दि. २२ नोव्हेंबर : निम का पत्ता कडवा है, कोश्यारी भडवा है, कोश्यारीच करायच काय खाली मुंडक वर पाय अशा घोषणा देत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करून तीव्र शब्दात निषेध भोकर तालुका शिवसेना पक्षा तर्फे दि.२१ नोव्हे रोजी करण्यात आला यामध्ये राष्ट्रवादी व छावा संघटनेने सहभाग नोंदवला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक भाष्य करून आपल्या बुध्दिमत्तेचे प्रदर्शन करणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर कार्यरत राहण्याचा काही अधिकार राहिला नसुन केंद्र व राज्य शासनाने याची त्वरित दखल घेऊन त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून पुतळ्याचे दहन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख माधव पाटील वडगावकर, शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, शिवसेना युवा तालुकाधिकारी आनंद जाधव हस्सापुरकर, शहर अधिकारी कृष्णा कोंडलवार,संतोष आलेवाड, रामा भालेराव,विशाल बुद्देवाड, परमेश्वर राव, शाम वाघमारे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष इंजी.विश्वभर पवार, प्रमोद देशमुख कामनगावकर, अँड.कदम, पप्पू बोलेवार, जवाजोद्दिन बरबडेकर, डॉ. फेरोज इनामदार, छावा संघटनेचे शंकर पाटील बोरगावकर, मुस्लिम लीग चे अकबर भाई, वहाब खाँन अदिसह इतर मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रोहेकरांची प्रदीर्घ प्रतिक्षा संपली,रोहा दिवा नवीन गाडी रुळावर,रोहेकरांच्या एकजुटीचे फलित

भ्रष्ट मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.