Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भ्रष्ट मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक.

जिल्ह्यात भ्रष्ट महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा हैदोस..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर जिल्ह्यात भ्रष्ट महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी हैदोस घातला आहे. जमीन फेरफार, सातबारा वर नाव चढवणे, तसेच जमिनी संदर्भात इतर कोणतेही काम करायचे असल्यास कागदावर वजन ठेवल्याशिवाय तलाठी आणि मंडळ अधिकारी कामच करत नाहीत असा आरोप केला जात आहे. कांचाड, कुडुस प्रमाणेच पालघर तालुक्यातील मनोर, नागझरी, बोईसर सफाळे या परिसरातील महसूल अधिकारी कर्मचारी देखील सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी, अनधिकृत गौण खनिज व्यावसायिकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पालघर/वाडा, 22 नोव्हेंबर :- पालघरच्या वाडा तालुक्यातील महसूल विभागातील कंचाड येथील मंडळ अधिकारी सुरेंद्र संखे यांना १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. फेरफार सदरी नोंद करून सातबाऱ्यावर नाव चढविण्यासाठी मंडळ अधिकारी सुरेंद्र संखे याने तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागितली होती, यातील १५ हजार रुपयांचा पाहिला हप्ता घेताना ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रकरणी तक्रारदार यांनी वाडा तालुक्यातील मौजे खानिवली येथील सर्व्हे नंबर १०५ मधील १ हेक्टर ३३ आर जमिन खरेदी केली असून त्याबाबत फेरफार नोंद करून सातबाऱ्यावर नाव चढविण्यासाठी मंडळ अधिकारी सुरेंद्र संखे याने तक्रारदार यांच्याकडून ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडी अंती २५ हजार रूपये रक्कम देण्याचे ठरले होते. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी याविरुद्ध ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यावेळी लाचलुचपत विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली आणि साफळा रचला असता.

दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ रोजी कंचाड मंडळ अधिकारी कार्यालयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ हजार रुपये रक्कमेपैकी १५ हजारांचा पहिला हप्ता लाच घेताना मंडळ अधिकारी सुरेंद्र संखे याला सोमवारी संध्याकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लाचखोर सुरेंद्र संखे याची वादग्रस्त कारकीर्द

लाचखोर मंडळ अधिकारी सुरेंद्र संखे हा अतिशय भ्रष्ट अधिकारी असून त्याला यापूर्वी देखील २ वेळा लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. मात्र, वरिष्ठांची असलेल्या आर्थिक हितसंबंधांमुळेच महसूल विभागात पुन्हा रुजू झाल्याने आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे सुरेंद्र संख्ये हा डिसेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्त होणार होता, मात्र सेवा निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात असताना त्यांना पुन्हा लाच स्वीकारताना पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ माजली असुन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अश्विनी पाटील यांच्या पथकाने केली असून नागरिकांकडून कारवाई केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कौतुक केले जात आहे.

पालघर जिल्ह्यात भ्रष्ट महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी हैदोस घातला आहे. जमीन फेरफार, सातबारा वर नाव चढवणे, तसेच जमिनी संदर्भात इतर कोणतेही काम करायचे असल्यास कागदावर वजन ठेवल्याशिवाय तलाठी आणि मंडळ अधिकारी कामच करत नाहीत असा आरोप केला जात आहे. कांचाड, कुडुस प्रमाणेच पालघर तालुक्यातील मनोर, नागझरी, बोईसर सफाळे या परिसरातील महसूल अधिकारी कर्मचारी देखील सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी, अनधिकृत गौण खनिज व्यावसायिकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हे देखील वाचा :-

आता.. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळा होणार ‘आदर्श’ !

धक्कादायक : प्रेयसीला मिठी मारून प्रियकराने घेतले जाळून..दोघेही गांभीर जखमी…

Comments are closed.