Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आता.. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळा होणार ‘आदर्श’ !

जिल्ह्यातील ७ शाळांचा समावेश : शाळा गुणवत्ता विकास आराखडावर भर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

भूषण बन्सोड, 

भंडारा जिल्हातील आदर्श शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व गटसाधन व्यक्ती यांची आदर्श शाळा योजना संदर्भात सुरु असलेल्या कामाचा यावेळी शिक्षणाधिकारी यांनी आढावा घेतला. शाळांचे ध्येय, उदिष्ट, नाविण्यपूर्ण उपक्रम, शाळा गुणवत्ता विकास आराखडा, शाळेच्या योजना, आव्हाने आदी विषयावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्या उपस्थितीत प्रत्येक शाळेनी आपल्या कामाचे सादरीकरण केले. अध्ययन निष्पत्ती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदर्श शाळा योजना अंमलबजावणी यंत्रणेत शांतीलाल मुथ्था फांउडेशनचा सक्रिय सहभाग आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भंडारा, २२ नोव्हेंबर :- महाराष्ट्र शासनाने राज्यात ४८८ शाळांना आदर्श शाळा म्हणून घोषित केले आहे. यात भंडारा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील एक अशा ७ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळांचा शाळा गुणवत्ता विकास आराखडा तयार होणार आहे. या शाळा गुणवत्तेने इतर शाळांना प्रेरणादायी ठरतील, हा मुख्य हेतू असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना बाबत नुकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा भंडारा येथे गटसाधन केंद्रात पार पडली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.राधा अतकरी, संपर्क अधिकारी व अधिव्याख्याता हेमा बांबल, अधिव्याख्याता गुलाबराव राठोड, विषय सहाय्यक देवानंद घरत, समग्र शिक्षा जिल्हा समन्वयक विरेंद्र गौतम, कनिष्ठ अभियंता सुशिल कान्हेकर, शांतीलाल मुथ्या फांउडेशने जिल्हा समन्वयक प्रख्यात उके, आदर्श शाळा संबंधित साधन व्यक्ती, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या शाळांचा आहे आदर्श शाळा योजनेत समावेश.

१. जि.प.शाळा सुरेवाडा, ता.भंडारा ,२. जि.प.शाळा चिचोली, ता.लाखांदूर ,३. जि.प.शाळा मांगली, ता.लाखणी ,४. जि.प.शाळा खमारी (बुज), ता.मोहाडी ,५. जि.प.शाळा चिचाळा, ता.पवणी ,६. जि.प.शाळा पिंडकेपार, ता.साकोली ,७. जि.प.शाळा देवनारा, ता.तुमसर या शाळांचा आदर्श शाळा योजनेत समावेश आहे.

जिल्हातील आदर्श शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व गटसाधन व्यक्ती यांची आदर्श शाळा योजना संदर्भात सुरु असलेल्या कामाचा यावेळी शिक्षणाधिकारी यांनी आढावा घेतला. शाळांचे ध्येय, उदिष्ट, नाविण्यपूर्ण उपक्रम, शाळा गुणवत्ता विकास आराखडा, शाळेच्या योजना, आव्हाने आदी विषयावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्या उपस्थितीत प्रत्येक शाळेनी आपल्या कामाचे सादरीकरण केले. अध्ययन निष्पत्ती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदर्श शाळा योजना अंमलबजावणी यंत्रणेत शांतीलाल मुथ्था फांउडेशनचा सक्रिय सहभाग आहे.

गुणवत्ता आराखड्यातून होईल प्रेरणादायी शाळा .

आदर्श शाळा योजनेत समाविष्ट शाळांचा शाळा गुणवत्ता विकास आराखडा तयार होणार असून शाळेत उपलब्ध असणा-या संसाधनांचा उपयोग करुन लोकसहभागाला यात विशेष स्थान आहे. विशेषत: शाळाच आपल्या शाळेचा आराखडा तयार करणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गुणवत्तेसाठी विशेष भर असणार आहे. यातून या शाळा पहिल्या टप्प्यात केंद्र, तालुका व जिल्ह्यात प्रेरणादायी शाळा ठरतील, यासाठी विशेष प्रयत्न असणार आहे.

हे देखील वाचा :-

धक्कादायक : प्रेयसीला मिठी मारून प्रियकराने घेतले जाळून..दोघेही गांभीर जखमी…

कर्तव्यात कसूर… महिला पीएसआय निलंबित

 

Comments are closed.