Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नांदेड शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने धरणे व निषेध आंदोलन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नांदेड, दि. २२ नोव्हेंबर :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द बोलणाऱ्या भाजप नेत्यांचा जाहीर निषेध व जोडेमारो आंदोलन तसेच महाराष्ट्राची कन्या स्व. श्रद्धा वालकर हिची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी धरणे आंदोलन आणि स्व. श्रद्धा वालकर यांना श्रद्धांजली व आंदोलन व जाहीर निषेध महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थित करण्यात आले.

त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. अमरनाथ राजुरकर, माजी पालकमंत्री डी पी सावंत, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी सभापती किशोर स्वामी, महिला जिल्हाध्यक्षा कविताताई कळसकर, माजी महापौर जयश्रीताई पावडे, दिलीपराव पा. बेटमोगरेकर, संजयराव लहानकर, विजय येवणकर, श्याम दरक, निलेश पावडे, नामदेवराव आईलवाड, तिरुपती कोंढेकर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.