Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमेरिकन महिलेसमोर टॅक्सीचालकाचे अश्लील चाळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई दि 29 नोव्हेंबर :- कामानिमित्त भारतात आलेल्या अमेरिकन महिलेसमोर टॅक्सीत अश्लील चाळे करणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली.योगेंद्र उपाध्याय असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. शनिवारी दुपारच्या वेळी तक्रारदार महिला आपले काम आटपून घरी जात होती. यावेळी तिने खासगी इनोव्हा कार बुक केली होती आणि या कारमध्ये तिचे सहकारीही होते. अंधेरी येण्यापूर्वीच तिच्यासोबत असलेले सहकारी इनोव्हा कार मधून उतरले.

दरम्यान अमेरिकन महिला चालकाच्या बाजूच्या सीटवर बसली होती आणि तिच्यासमोरच चालकाने महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न अशा प्रकारचे कृत्य केल्याने ती घाबरली. तिने चालकास कार जे. पी. रोडवर थांबवण्यास सांगितले. ही बाब रस्त्यावरील लोकांना कळताच त्यांनी चालकाला पकडून डी.एन. नगर पोलिसांच्या ताब्यात दिले.महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून चालक योगेंद्र उपाध्याय याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

Comments are closed.