Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तालुक्यातील विकासकामांना गती द्या..

सौ.गिरीजा कोरेटी माजी सरपंचा तथा महिलाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरची यांची मागणी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कोरची 13, डिसेंबर :- तालुक्यात कोविड-19 पासुन विकासकामे मंद गतीने होत आहे. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळणे कठीण आहे. तालुक्यातील बेरोजगार युवक-युवती रोजगाराच्या शोधात शहराकडे पलायन करत आहेत. अपुर्ण अवस्थेत असलेले प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ते व फुलाचे काम त्वरित सुरू करावे तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये काम सुरू करुन बेरोजगारांना रोजगार द्यावे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देऊळभट्टी-पाटीलटोला येथील माघील तीन ते चार वर्षांपासून अपुर्ण अवस्थेत अलेले पुलाचे काम त्वरित सुरु करावे. बेतकाठी वरुन छत्तीसगड ला जोडणाऱ्या रस्तावरील पुल पाण्याचा प्रवाहाने वाहुन गेल्यामुळे दळणवळणासाठी अडचण येत आहे. नवीन पुल मंजूर करून बांधकाम करावे. वाको वरून छत्तीसगढ ला जोडणारा रस्त्यावरील नालावर नवीन पुल मंजूर करुन बांधकाम करण्यात यावे.नांगपुर ते ढोलडोंगरी पर्यंत रस्ताचे डांबरीकरण करावे. कोटगुल ते कोसमी नं 2 पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करावे. बेतकाठी ते बोटेकसा पर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु करावे. तालुक्यातील आधार कार्ड केंद्र त्वरित सुरु करावे.
तसेच विकासात्मक दृष्टीने कोरची तालुक्यातील कोटगुल या गावाला तालुकाचा दर्जा देऊन कोटगुल तालुक्याची निर्मिती करावे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.