Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सहा वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 14 कोटी 75 लाख रुपयांच्या जुन्या नोटा धुळ खात पडून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सांगली 12 , जानेवारी :- नोटाबंदीच्या निर्णयाला सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत,मात्र अद्यापही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जुन्या नोटा बदलून मिळाल्या नाहीत,एक-दोन नव्हे तर तब्बल 14 कोटी 75 लाखांच्या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँकेत धूळखात पडून आहेत.बँकेतील नोटा सांभाळण्यासाठी रोजरास पणे बँकेला कसरत करावी लागत आहे, रिझर्व बँकेकडून नोटा बदलून देण्यात याव्या यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.त्याची सुनावणी सध्या सुरू आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच राज्यातल्या आठ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुना नोटा अद्याप पडून आहेत. ज्याची एकूण रक्कम सुमारे 112 कोटी रुपये इतकी असून या जुन्या बदलुन मिळाव्यात म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचा लढा आता न्यायालयामध्ये सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.