Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हयात 37(1) (3) कलम लागू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 4 फेब्रुवारी :- पोलीस अधीक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. मौजा सिरोंचा येथे, दिनांक 08 फेब्रुवारी 2023 ते 09 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत हजरत वली हैदरशाह बाबा उर्स उत्सव साजरा होणार आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री यात्रा उत्सव व दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.

तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे,आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 05.02.2023 चे 00.01 वा ते दिनांक 19.02.2023 चे 24.00 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम ,1951 चे कलम 37(1) (3) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आली आहे. असे अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.