Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 20 हजाराचा टप्पा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

24 तासात जिल्ह्यात चौघांचा मृत्यू, 167 नव्याने पॉझिटिव्ह ; 72 कोरोनामुक्त.

आतापर्यंत 17,904 बाधित झाले बरे, उपचार घेत असलेले बाधित 1,905

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर, दि. 1 डिसेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात चार कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला असून 167 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. यासोबतच सुरवातीपासून आतापर्यंत बाधीत झालेल्यांची एकूण संख्या 20 हजार 115 वर पोहचली आहे.
तसेच 72 जणांनी कोरोनावर मात केल्याने काल त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 904 झाली आहे. सध्या एक हजार 905 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 50 हजार 947 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 28 हजार 408 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्या बाधितामध्ये कटवाल भद्रावती येथील 59 वर्षीय महिला, वडगाव चंद्रपूर येथील 62 वर्षीय पुरूष, चिंचाळा, चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरूष तसेच सावरघाटा, सिंदेवाही येथील 41 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 306 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 283, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 167 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 66, चंद्रपूर तालुक्यातील 11, बल्लारपुर तालुक्यातील 15, भद्रावती 11, ब्रम्हपुरी दोन, सिंदेवाही एक, मुल 12, पोभुर्णा एक, गोंडपीपरी एक, राजुरा 10, चिमुर चार, वरोरा 27, कोरपना एक व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.