Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दामरंचा येतील नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचं पाणी

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभहस्ते टाकीच्या भूमिपूजन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी 13 फेब्रुवारी :- अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय दामरंचा अंतर्गत येत असलेल्या भंगारामपेठा, कोयागुड्डा, वेलगुरआदि गावासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याचं पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली. सदर विहीर व टाकीच्या भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. दामरंचा गावाला लागूनच मोठी नदी आहे मात्र गावनिर्मितीपासून येते टाकी उपलब्ध नसून गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचं पाणी मिळत नव्हता, मात्र जि.प.अध्यक्ष यांच्या कडे नवीन विहीर व टाकी साठी मागणी केली असता जिल्हा परिषद बांधकाम विभागातून निधी मंजूर करण्यात आले असुन भूमिपूजन सम्पन्न झाली असून करोडो रुपये देवून या टाकी व विहीर बांधकाम करण्यात येणार असून प्रत्येक घरी नळ जोळणी करून पाणी उपलब्ध होईल.

या भूमिपूजन कार्यक्रमाला दामरंचा ग्राम पंचायतचे सरपंचा सौ.किरणताई कोडापे, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी सभापती सौ.सूरेखाताई आलाम, सचिन ओल्लेटीवार उपसरपंच कमलापुर, नरेंद्र गर्गम, माजी सरपंच जिलकरशहा मडावी, प्रमोद कोडापे, कार्तिक अल्याडवार, भुजंगराव आलाम, आशिष सडमेक, विनोद दूनलवार, विलास तलांडे, सम्मा लिंगम, येलय्या सुरमवर, सतीश चौधरी, पार्वती वेलादी, शशिकला सडमेक, कविता तलांडी, संगीता आलाम, काजल आलाम, सुशीला कोडापे, चीनक्का सुरमवार रामनाथ सडमेक, सुरेश आलाम, प्रदीप तोरैम,भास्कर कोडापे, संजय सुरामवार, नामदेव तलांडे, नरेश मडावी व गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.