Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हायवेवर चालणाऱ्या ट्रकवर दरोडा घालत लुटणाच्या टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी केलं जेरबंद

आंतरराज्यीय टोळीतील चौघांना अटक करण्यात आली असून दोन आरोपींचा शोध सुरू 48 लाखाच मुद्देमाल पोलिसांनी केलाय जप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर 24 फेब्रुवारी :- हायवेवर चालणाऱ्या ट्रकवर दरोडा घालत लुटणाच्या टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केलं असून या आंतरराज्यीय टोळीतील चौघांना अटक करण्यात आली असून दोन आरोपींचा शोध सुरू असून 48 लाखाच मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.

नागपूर ग्रामीणमध्ये मौदा आणि रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रकला अडवत चालक आणि क्लिनरला मारहाण करून ट्रक घेऊन पसार झाल्याचे दोन गुन्हे दाखल झाले होते. याच तपासात चोरीच्या पद्धतींत साम्य असल्यानं घटनेचा तपास करत असताना आंतरराज्यीय टोळी असल्याचा शोध लागला. यातील आरोपी हे नागपुरारात फ्लॅट करून राहत होते. माहामार्गवर रेकी करून सावज शोधण्यासाठी कार सुद्धा चोरली होती. दोन्ही चोरीचे ट्रक विकण्याचा बेतात असतांना आरोपी नागपूर ग्रामीणच्या एलसीबी पथकाच्या हाती लागले. यातील चार आरोपी पंजाब, मुंबई, यूपीतील आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.