Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 19 एप्रिल :गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेकरिता डॉ. विवेक जोशी सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजित मंडल , प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हरिशिव प्रसाद उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ विवेक जोशी यांनी चार वर्षीय पदवी आणि पारंपारिक पदवी यामधील फरक समजावून सांगितला तसेच कौशल्य आधारित विकास अभ्यासक्रम कसा डिझाईन केला जातो आणि त्याचे कसे महत्त्व आहे याबद्दल मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळा करिता शहीद वीर बाबुराव माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा, भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा मुलचेरा, नेताजी सुभाषचंद्र कनिष्ठ महाविद्यालय सुंदरनगर आणि नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथील एकूण १५० विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कार्यशाळेचे संचालन प्रा.गौतम वाणी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरिशिव प्रसाद यांनी केले .या कार्यक्रमाचे आभार डॉ. शनवारे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.