Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या कातडीसह दोन आरोपींना अटक

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील घटना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 21 जून – भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात वाघाच्या कातडीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भंडारा आणि नागपूर येथील वन विभागाच्या चमूने संयुक्त कारवाई करीत या दोन तस्करांना पकडले आहे. निलेश सुधाकर गुजराथी रा. चंद्रपूर वय- 33 वर्ष विकास बाथोली बाथो रा. चंद्रपूर वय – 31 वर्ष असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत. या दोन्ही तस्करांना संबंध आंतरराष्ट्रीय तस्करांशी असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यांच्या अटकेनंतर अजूनही काही लोकांना अटक केल्या जाण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यांपासून नागपूर वनविभागाला गुप्त माहिती मिळाली की भंडारा येथे वाघाच्या कातडीची तस्करी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आधारे वनविभागाने या आरोपींवर पाळत ठेवली. बुधवारी २१/६/२३ ला नागपूर वनविभागास प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करुन भंडारा विभागाच्या पथकासह संयुक्त कार्यवाही करुन वाघाच्या कातडी सह या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अनुक्रमे निलेश सुधाकर गुजराथी रा. चंद्रपूर वय- 33 वर्ष विकास बाथोली बाथो रा. चंद्रपूर वय – 31 वर्ष याना ताब्यात घेण्यात आले आह. त्यांच्या कडून वाघा ची कातडी 1 नग, लांबी 82cm X रूंदी 79 cm व Activa दुचाकी क्रमांक MH 34 CB 2717 जप्त करण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या विविध कलामा द्वारे वनगुन्हा नोदविण्यात येणारं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.