Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलाने र संशयीत ईसमांकडुन २७ लाख ६२ हजार रु. केले जप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 07 जुले – भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२३ नंतर २ हजार रु च्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. त्यामुळे नागरिक सध्या २ हजार रु. च्या नोटा बँकेतून बदलून घेत आहेत. याच पार्श्वभुमीवर माओवाद्यांनी बेकायदेशीर रित्या जमवलेले पैसे ते लोकांच्या माध्यमातुन वेगवेगळ्या ठिकाणाहून बदलवून घेत आहेत. ब-याच ठिकाणी माओवाद्यांच्या या रक्कमा जप्त केल्या गेल्या आहे. आज दिनांक ०५/०७/२०२३ रोजी दुपारी ०२.०० वा. एका मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकांच्या जवानांची नाकाबंदी अहेरी येथे लावली असता त्याठिकाणी २ संशयीत इसमाकडुन २७ लाख ६२ हजार रुपयाचे बेकायदेशीर रक्कम मिळुन आली.

सविस्तर माहिती अशी की, संशयीत इसम १) नामे रोहीत मंगु कोरसा, वय २४ वर्ष, रा. धोडुर ता. एटापल्ली जि. गडचिरोली, २) नामे बिप्लव गितीश सिकदार, वय २४ वर्ष, रा. पानावर जि. कांकेर (छ. ग.) हे दोघे मोटार सायकलने जात असतांना नाकाबंदी दरम्यान विचारपुस केली असता त्यांच्याजवळ २ हजार रु. ६०७ नोटा एकुण रक्कम १२,१४,०००/- रु. ५००रु. ३०७२ नोटा एकूण रक्कम १५, ३६, ०००/- रु. २०० रु. ७ नोटा एकुण रक्कम १४००/- रु. व १००रु. १०६ नोटा एकूण रक्कम १०,६००/- रु. असे मिळून २७, ६२,०००/- ( सत्ताविस लाख बासष्ट हजार रुपये) त्यांच्या जवळुन मिळुन आले. एवढ्या मोठ्या रक्कमेबाबत विचारपुस केली असता त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. अधिक विचारपुस केली असता अशी माहिती मिळुन आली की, ही रक्कम भारत सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे असुन त्यातील २ हजार रुपयाच्या नोटा बदलविण्यासाठी दिले गेले आहेत. मिळुन आलेल्या दोन्ही इसमांवर यूएपीए अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असुन पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावरुन असे दिसुन येते की, माओवादी जनतेच्या हितासाठी कधीच लढले नाहीत त्यांचा लढा हा फक्त पैशासाठी, सत्ता गाजविण्यासाठी, गरीब आदिवासींची पिळवणुक करण्यासाठीच चालत आला असुन वेगवेगळ्या ठेकेदारांकडून खंडणीच्या माध्यमातून गोळा केलेला पैसा त्यांनी कधीच जनतेच्या विकासासाठी हितासाठी वापरला नाही. माओवाद्यांनी हा पैसा फक्त भारत सरकार विरुद्ध देशविघातक कृत्ये करण्यासाठी व स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे. गडचिरोली पोलीस दल सर्व नागरीकांना आवाहन करते की, माओवाद्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडु नका व कोणी बेकायदेशीर २ हजार रु. च्या नोटा बदलविण्यासाठी सांगत असले तर जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमके ला संपर्क करावा.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक गडचिरोली  नीलोत्पल तसेच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण पहा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.