Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विचारज्योत फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वाचनालयाला पुस्तके भेट…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 26 जुलै – विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सकमुर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध पुस्तके भेट कार्यक्रम सोहळा नुकताच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर बोडलावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी १० वी, १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच विविध महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या ३५ हून अधिक पुस्तकांचा संच शाळेच्या वाचनालयाला भेट स्वरूपात देण्यात आला.

विचारज्योत फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील एक वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. असाच एक सामाजिक उपक्रम म्हणून विचारज्योत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा इंडीया दस्तक न्युज टीव्हीचे मुख्य संपादक, कवी, लेखक, पत्रकार सुरज पी. दहागावकर यांच्या २६ जुलै या जन्मदिवसाच्या निमित्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सकमुर येथील कु. मयुरी चनकापुरे यांची महाराष्ट्र पोलीस, मुंबई म्हणून निवड झाल्याबद्दल विचारज्योत फाऊंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर बोडलावार, विचारज्योत फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सिद्धार्थ दहागावकर, सदस्य रंजना दहागावकर, गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती स्वप्नील अनमुलवार, ग्रामपंचायत सकमूरचे सदस्य संतोष मुगलवार, जि. प. उच्च प्राथमिक शाळा सकमुरच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका नंदा चटारे, संजय गोविंदवार, सुनील खापर्डे, शामलता झाडे, गजानन झाडे, पुंडलिक काळे, किशोर गेडाम, तुफान मानकर, खुशाल काळे, सुरेश कुंभरे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.