ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळ अहेरी तर्फे सुरेश बंडावार यांचे सत्कार व निरोप समारंभ.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 27 जुलै – स्थानिक अहेरी येथील विठ्ठल रखुमाई देवस्थान येथे ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळ अहेरी तर्फे सेवानिवृत्त प्रभारी संवर्ग विकास अधिकारी सुरेश बंडावार यांचा सपत्नीक सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम पार पाडण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कन्ना मडावी, अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय अहेरी व प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विनोद भोसले, माजी प्राचार्य प्रमोद दोंतूलवार, ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष नानाजी जक्कोजवार, सचिव अशोक निकुरे, जगन्नथराव दोंतूलवार माजी सरपंच हे मंचावर उपस्थित होते.
आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती संदर्भात विनोद भोसले यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना मूळचे अहेरी येथील रहिवासी व वर्गमित्र आहेत. त्यांनी प्रभारी बी. डी. ओ. म्हणून कार्यभार पार पाडले असून मनमिळावू व दुसऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन समस्यांचे निराकरण करणारे व गरजूंना योग्य मार्गदर्शन करणारे आहेत .लहानपणापासूनच त्यांची सवय त्यांनी जोपासली होती. आजही ही सवय त्यांच्यामध्ये कायम आहे. प्रमोद दोंतूलवार यांनी बंडावार हे श्रीमंत कुटुंबातून जन्मलेले होते. परंतु त्यांना श्रीमंतीचा मुळीच घमंड नव्हते.
डॉ कन्ना मडावी यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना जरी साहेबांसोबत जास्त कालावधी नसला तरी त्यांचं मनमिळाऊ स्वभाव एखाद्याला आपलेसे करून घेणे हे त्यांचे स्वभाव आहे .वयोमानानुसार जो व्यक्ती भेटेल तसे त्यांच्यासोबत त्यांचे वागणूक होते.नानाजी जक्कोजवार यांनी बंडावार शेजारी राहत होते त्यांनी कधी पदाचा किंवा श्रीमंतीचा गर्व केला नाही असे त्याने प्रतिपादन केले. प्रत्येकाला सहानुभूतीचे वागणूक देत होते अशोक निकुरे यांनी प्रास्ताविकेत त्यांचे शासकीय नोकरी आरंभ ब्रह्मपुरी येथून तर अहेरी बी. डी. ओ. पर्यंतचे कालखंड सुखद व सुखरूप प्रवास होता.आताही ते आपली अर्धान्गीला घेवून अहेरी इथे राहत होते. आरोग्य दृष्टया दिवसेंदिवस दूर्लभ होवून राहीलो आहो असे त्यांनी प्रतिपादन केले.
त्या वेळी उपस्थिती मंडळी भाऊक झाले. मी व माझे पत्नी, माझे दोन मुल आहेत. पंकज आणि राकेश व नातंवड आहेत शेवटचे दिवस त्यांच्या सोबत घालवायची इच्छा असल्यामुळे मी आपला निरोप घेऊन जात आहे.जरी इथून जाणार आहोत तरीही माझी जन्मभूमी मी कधी विसरणार नाही असे त्यांनी आपल्या मनोगतुन व्यक्त केले. या कार्यक्रमाचे यशस्वी करता सर्व त्यांचे मित्र मंडळी, नातलग व विठ्ठल रुक्माई देवस्थानचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी करता ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळ अहेरी व सेवानिवृत्त शिक्षक संघटना अहेरी चे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन अशोक पूसलावार यांनी केले व आभार प्रदर्शन बबलू सडमेक यांनी मानले.
हे पण वाचा :-


Comments are closed.