अहेरीचा धावपटू राष्ट्रीय स्पर्धेकरिता रवाना
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 27 जुलै – नॅशनल स्पोर्ट्स व फिजिकल फिटनेस बोर्ड द्वारा होणाऱ्या दिनांक 26 ते 30 जुलै 2023 दरम्यान हरियाणा येथील पानिपत मधील राष्ट्रीय खेळात ॲथलेटिस प्रकारात धावपटू लच्चा दुग्गा वेलादी याची निवड झाल्याने प्रशिक्षक रवी भांदककार यांच्यासोबत आज रवाना झाला. अरुणाचल प्रदेश ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष तथा इंडियन ऑलिंपिक कमिटीचे उपाध्यक्ष माजी केंद्रीय क्रीडामंत्री पिडो रीच्चो तसेच सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी क्रीडा विभाग अरुणाचल प्रदेश मा. संदीप भल्ला यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात होणाऱ्या आयोजनातील खेळात सहभागी होणार आहे.
लच्छा मडावी हा अथलेटिक्सच्या 100 मीटर व 400 मीटर धाव प्रकारात विदर्भ टीम मधून निवड झाल्याने तो पानिपत येथे खेळात सहभागी होणार आहे.ऑनलाइन परफॉर्मन्स बेस व शासनाच्या आदिवासी विकास विभागाद्वारे आयोजित खेळात सुवर्णपदक प्राप्त केल्यामुळे जागतिक मास्टर्स कराटे सुवर्णपदक विजेता तथा क्रीडा मार्गदर्शक सेनसाई रवी भांदककार यांनी स्वीकृत मार्गदर्शनातून त्याची निवड केली.लच्छा मडावी हा शासकीय आश्रम शाळा पेरमिलीचा माजी विद्यार्थी असून सध्या तो वर्का व जेडीकेए प्रणित रवी सर्श मार्शल आर्ट कराटे अकॅडमीतून प्रशिक्षण घेत आहे.त्याच्या निवडीबद्दल मित्रपरिवार व नागरिकांनी त्याचे अभिनंदन करून त्याला पुढील खेळासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
हे पण वाचा :-


Comments are closed.