Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एस बी महाविद्यालयात “मेरी माटी मेरा देश “

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 12 ऑगस्ट 2023 : स्थानिक श्री शंकरराव बेझलवार कला-वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागा तर्फे मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात शपथ ग्रहण कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.पी.जी.लाभसेटवार तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.आर.डी.हजारे, इंग्रजी विभाग प्रमुख, तसेच प्रमुख उपस्थिती प्रा.पी.व्ही.घोडेस्वार, डॉ.
आंबेडकर विचारधारा विभाग प्रमुख हे होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रसंगी डॉ.आर.डी.हजारे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना भूमातीची आपुलकी आणि देशप्रेम या विषयावर विस्तृत व प्रेरणादायी विचार मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.जी.लाभसेटवार यांनी मेरी माटी मेरा देश या मार्गदर्शनपर विचार मांडून उपस्थितांना शपथ दिली.या कार्यक्रमाला प्रा.मंगला बनसोड, प्रा.सी.एन.गौरकार, प्रा.डी.एम.आवरी, डॉ. रुप्रा घोनमोडे,नामदेव पेंदाम,प्रा.सुमित मोहुर्ले.प्रा.जवादे,सहयोग बँकचे शाखा प्रबंधक  देवेंद्र दुर्गे त्यांच्या चमूसह उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .अमोल शंभरकर यांनी केले तर आभार प्रा.सी.एन.गौरकार यांनी मानले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.