Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

25 ऑगस्ट रोजी तृतीयपंथी व्यक्तींच्या विकासासाठी मेळावा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 24 ऑगस्ट : तृतीयपंथी व्यक्तीच्या सर्वतोपरी विकास होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा, याकरीता दिनांक 25 ऑगस्ट 2023 सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली परिसरात मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

सदर मेळाव्यात जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींनी सर्वतोपरी लाभ देण्याच्या अनुषंगाने विविध विभागामार्फत पात्र व्यक्तींना लाभ वितरीत करण्यात येणार आहेत. यामध्ये मतदार नोंदणी, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, कृषी विषयक योजना, संजय गांधी योजना, घर घर नळ तसेच त्यांची मोफत आरोग्य चाचणी करणे इत्यादी योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी व्यक्तींनी मेळाव्याला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी, संजय मीणा यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.