Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक तिघे जागीच ठार..

एकाच कुटुंबातील दुचाकीवरील तिघे जागीच ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 25 सप्टेंबर : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना २५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. मृतांत आई- मुलासह चुलत सासूचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघे गतप्राण झाल्याने मार्कंडा गावावर शोककळा पसरली आहे.

प्रियंका गणेश जनध्यालवार (२४) , रुद्र गणेश जनध्यालवार (५) व भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) अशी मृतांची नावे आहेत. नरेंद्र नरेश जनध्यालवार (५२) हे जखमी आहेत. मार्कंडादेव (ता.चामोर्शी) येथील हे कुटुंब कामानिमित्त तहसील कार्यालयात आले होते. काम आटोपून दुपारी ४ वाजता दुचाकीवरुन (एमएच ३३ के-३१३५) गावी जाण्यासाठी निघाले. याचवेळी सुरजागड येथून लोहखनिज घेऊन ट्रक (सीजी ०८ एयू- ९०४५) येत होता. या ट्रकने तहसील कार्यालयासमोर दुचाकीला चिरडले. रुद्र व भावना यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियंका यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. नरेंद्र जनध्यालवार यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघातानंतर चालकाने वाहन तेथेच सोडून पोबारा केला. अपघात एवढा भीषण होता की ट्रकमध्ये फसलेले मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलवावा लागला. यावेळी मोठी गर्दी झाली होती. एकाच कुटुंबातील तिघे गतप्राण झाल्याने मार्कंडा गावावर शोककळा पसरली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.