Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

12 व्या अखिल भारतीय पोलीस तिरंदाजी स्पर्धेत गडचिरोली पोलीस दलाच्या अधिका­याने पटकावले कांस्य पदक

आरमोरी येथे कार्यरत असलेले पोउपनि सुरज अनपट यांची यशस्वी कामगिरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 22 फेब्रुवारी – गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट अतिसंवेदनशिल जिल्हा असून गडचिरोली पोलीस दलातील पोलीस जवान हे या दुर्गम-अतिदुर्गम भागात आपली सेवा बजावत विविध कलागुण जोपासत असतात 30 जोनवारी ते 04 फेब्राुवारी 2024 दरम्यान बँगलोर (कर्नाटक) येथे पार पडलेल्या 12 व्या अखिल भारतीय पोलीस तिरंदाजी स्पर्धेत गडचिरोली पोलीस दलातील पोस्टे आरमोरी येथील कार्यरत असलेल्या पोउपनि सुरज सुनिल अनपट यांनी इंडियन राउंड प्रकारात महाराष्ट्र पोलीस संघाचे नेतृत्व करत कांस्य पदक प्राप्त केले. कांस्य पदकासाठी महाराष्ट्र पोलीस संघाने आयटीबीपी संघाचा 6-4 अशा फरकानेे पराभव केला.

पोउपनि सुरज अनपट यांच्या या यशस्वी कामगिरी करिता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांनी देखील पोउपनि सुरज अनपट यांना शुभेच्छा दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.