‘मिशन पुना आकी’: दुर्गम भागात आधार-जन्म दाखला देण्यासाठी विशेष मोहिम
पंचायत समिती भामरागडचा उपक्रम
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 12 जुन – गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्यात नागरिकांना आधार कार्ड व जन्म दाखला जागेवरच उपलब्ध करून त्यांच्या समस्या सोडवण्याकरिता तसेच महिलांच्या आरोग्यावर जनजागृती व्हावी याकरिता पंचायत समिती भामरागड तर्फे आकांक्षीत तालुका कार्यक्रम अंतर्गत ‘मिशन पुना आकी’ म्हणजेच ‘मिशन नवी पालवी/सुरवात’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्रे, विशेषत: आधार कार्ड, बँक खाते, जातीचे प्रमाणपत्र व जन्मदाखला हे महत्त्वाचे असते.. पंचायत समिती भामरागडने आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत अशा योजनांबाबत दस्तऐवज घरोघरी पोहोचवणे आणि महिलांच्या आरोग्यसंबंधात जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.– आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली.
Comments are closed.