लाडका कंत्राटदारनंतर आता मुख्यमंत्र्यांची लाडका बिल्डर योजना
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 22 जुले – गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का? असा संतप्त सवाल करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते.
Comments are closed.