युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रीत
जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतो.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
राज्याचे युवा धोरण 2012 अन्वये 12 नोव्हेंबर, 2013 च्या शासन निर्णयानुसार, सदर पुरस्कार जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतो. तरी पात्रतेचे निकष पुर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयातुन अर्ज प्राप्त करुन, आवश्यक कागदपत्र व शासन निर्णयानुसार पात्रतेच्या निकषाचे पुरावे व मुल्यांकनाच्या पुराव्याचे संपूर्ण कागदपत्रासह तसेच युवक-युवतीचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व संस्थेसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्रासह आपला परिपुर्ण प्रस्ताव दि. 30 ऑगष्ट 2024 पर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथे सादर करावा.
तसेच अधिक माहिती करीता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दि. 12 नोव्हेंबर, 2013 रोजीचा शासन निर्णयाचे अवलोकन करावे किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.
युवक व युवतींसाठी पात्रतेचे निकष :
अर्जदाराने पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.
संस्थांसाठी पात्रता निकष.
अर्जदार व संस्थासदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य पडताळणी दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.
पुरस्कारासाठी मुल्यांकन
Comments are closed.