Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काँग्रेस कोणी संपवू शकत नाही

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची तोफ आज नांदेड येथे धडाडली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर, 12 ऑगस्ट – काँग्रेस पक्ष नेत्यांचा नसून काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे नांदेडची जागा काँग्रेसला मिळाली. नेते येतील आणि जातील पण नांदेडमध्ये काँग्रेस कोणी संपवू शकत नाही. काँग्रेसची मूळं नांदेड जिल्ह्यात खोलवर रुजली आहेत, डर गया सो..भाग गया पण लक्षात ठेवा आम्ही घाबरणारे नाही. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची तोफ आज नांदेड येथे धडाड

मराठवाडा येथे काँग्रेसने तीन जागा लढवल्या आणि तिन्ही जागा जिंकल्या मराठवाड्याने १०० टक्के निकाल दिला. त्यामुळे तुम्ही निर्धार करा आणि हात उंचावून सांगा विधान सभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवला शिवाय आम्ही थांबणार नाही. असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जेंव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा खासदार वसंतराव चव्हाण यांच्या नावाने त्याची सुरुवात होईल. काँग्रेस नेते अमितजी देशमुख यांची तोफ देखील आता धडाडत आहे आधी त्यांच्याकडे दारूगोळा होता पण पेटवता येत नव्हता. आता मात्र ताकद मिळाली आहे. वो लाख कह दे की आकाश हू मैं, जमीन हू मैं, मगर उन्हे पता है काँग्रेस के बगैर वो कुछ नही,या शेरच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्यांना टोला लगावला. काँग्रेस पक्षाला विधानसभेत मराठवाड्यातून १०० टक्के निकाल मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोयाबीन उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. कापसाला दर मिळत नाही. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. तरीही महाराष्ट्राच्या गादीवर बसलेल्यांना लाज वाटत नाही. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली आहे. महायुतीच्या कारभारामुळे राज्य उध्वस्त झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

काँग्रेस म्हणजे नैसर्गिक पक्ष भाजप मात्र कृत्रिम आहे. चोर, डाकू, लुटेरे सगळे आता भाजप मध्ये गेले आहेत. कोणी सीबीआय, इडी मुळे घाबरून गेले. तिथे आता चोरांचा बाजार झाला असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.