Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची खासदार वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली

काँग्रेसचे निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड - वडेट्टीवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई – नांदेडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम राखणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने काँग्रेसचे निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. काँग्रेससाठी त्यांनी दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात शोक भावना व्यक्त करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शोक संदेशात म्हणतात की, काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहून खासदार वसंतराव चव्हाण यांनी कठीण काळात काँग्रेस पक्षाला साथ दिली. नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटना टिकवून ठेवत काँग्रेस पक्ष हेच आपले कुटुंब मानून ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक असणाऱ्या वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सरपंच, आमदार, खासदार असा त्यांच्या प्रवास प्रेरणा देणारा आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी जनतेचे प्रश्न तळमळीने मांडले. राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठे योगदान दिले आहे. त्यांनी काँग्रेस पक्षासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या निधनाने चव्हाण कुटुंबीय, पक्षाचे कार्यकर्ते, त्यांचा मित्र परिवार, सहकारी दुःखात आहेत. या दुःखातून सावरण्याचे बळ सर्वांना मिळो ही प्रार्थना.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.