दारू व तंबाखू नियंत्रणासाठी कारवाईत वाढ व दंड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त असावे, यासाठी नेमलेल्या नोडल ऑफिसरने व कार्यालय प्रमुखाने त्या त्या कार्यालयात अंलबजावणी करावी, नियमानुसार दंड करावे. सोबतच एसटी बसेस मध्ये कुणीही खर्रा किंवा तंबाखूपदार्थ खाऊन बसत असल्यास, थुंकत असल्यास सार्वजनिक मालमत्तेचे ते विद्रूपिकरण होते, इतर निर्व्यसनी व्यक्तीला त्रास होतो. अशा व्यसन करणाऱ्या व्यक्तीला मनाई करावी, आवश्यक ठिकाणी दंड करावा. सर्व बसेस मध्ये जागृती व प्रतिबांधा करिता नियमांचे छोटे फलक लावावे. एस. टी. महामंडळ चालक वाहक यांनी दारू, तंबाखू खर्राचे व्यसन करू नये. आगार व्यवस्थापक द्वारा चालक वाहक व कर्मचारी करिता एक कार्यशाळा यासाठी आयोजित करावी.
तसेच स्थापन केलेल्या मुक्तिपथ ग्राम पंचायत समितीने अवैध दारू व तंबाखू नियंत्रण करिता कायदेशीर पद्धतीने ग्राम पंचायत पातळीला, गावात कृती करावी. सदर अहवाल ग्राम पंचायत नुसार बिडीओ यांनी सीइओ जिप. यांना सादर करावा. अन्न औषध विभागाने सुगंधित तंबाखू विक्री विक्रेत्यावर कारवाया कराव्या, वाढवाव्या. इत्यादी प्रकारचे कडक निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी यावेळी संबधित विभागांना देऊन त्वरित कृती करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांचे परवानगिने बैठकीची सांगता करण्यात आली. या बैठकीला मुक्तिपथचे श्री कमलकिशोर खोब्रागडे, शिक्षण विभागाचे अमरसिंग गेडाम व विवेक नाकाडे, फाल्गुन राखेडे आगार व्यवस्थापक गडचिरोली, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या मीना दिवटे व दिनेश खोरगडे इत्यादी विविध विभागप्रमुख तसेच प्रतिनिधी बैठकीला हजर होते.
Comments are closed.