Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तिकीट न भेटलेल्या नाराजांनी जयश्रीताईंना समर्थन द्यावे : शेतकरी कामगार पक्षाचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : काॅंग्रेस – भाजप या प्रस्थापित पक्षांची गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरीता उमेदवारी मिळावी म्हणून अनेक जणांनी आप आपल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे प्रयत्न चालविले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी इच्छुकांना तिकीट नाकारले म्हणून मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहेत. अशा नाराजांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्रीताई वेळदा – जराते यांना निवडणूकीत छुपी मदत करून आप आपल्या पक्षाला धडा शिकवावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले आहे.

आप आपल्या पक्षांकडून आपल्यालाच तिकीट मिळावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी जीवाचे रान केले होते. पण पक्षातील काही मुठभर लोकांनी काहींना तिकीट मिळू दिले नाहीत. यामुळे पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र अनेक वर्षे ज्या पक्षात आणि विचारधारेत प्रामाणिकपणे काम करून आता उघड बंडखोरी करून पक्षात आपले आणखी महत्त्व कमी करण्यापेक्षा आप आपल्या पक्षात राहूनच या अन्यायाचा बदला घेणे सोईचे असून आपली सर्व ताकद शेतकरी कामगार पक्षाच्या संघर्षशिल महिला उमेदवार जयश्रीताई वेळदा – जराते यांच्या पाठीशी उभी करावी. व एका सामान्य कार्यकर्तीला प्रचंड बहुमताने निवडून आणून उमेदवारी देण्यात अन्याय करणाऱ्या आप आपल्या पक्षाला अद्दल घडवावी अशी विनंतीही भाई रामदास जराते यांनी नाराजांना केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.