जनतेला न्याय देण्यासाठी धर्मरावबाबा जनसेवेत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : ७० वर्षापेक्षा जास्त वय असूनही मी आजही जनसेवेत ताकदीने उभा आहे. गेल्या ५० वर्षापासून मी जनतेच्या सेवेत व सुख-दुखात सहभागी आहो. सकाळी उठल्यापासून ते रात्रो झोपेपर्यंत मी जनतेच्या कायम सेवेत असतो. माझे दरवाजे जनतेसाठी कधीही खुले आहेत मी जनतेला कधीही ताटकळत ठेवत नाही असे महायुतीचे उमेदवार मा. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला विनवणी केली आहे.
मा मंत्री श्री.धर्मरावबाबा आत्राम यांचा अहेरी मतदार संघात झंझावाती दौरा सुरु असून अहेरी व सिरोंचा तालुक्यातील प्रत्येक गावोगावी फिरून मतदाराच्या भेटी गाठी घेऊन जनतेशी संवाद साधत आहेत. तसेच महायुती सरकारच्या काळातील राबविण्यात येत असलेल्या योजना लाडकी बहिण योजना, शेतपंप मोफत योजना , रस्ते, पूल व कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक करणारे उधोग मोठया प्रमाणात अहेरी मतदारसंघात येणार असल्याचे मा. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जनतेला पटवून देत आहेत.
मला कधीही हाक दिली तरी मी जनतेच्या सेवेत तात्काळ उपस्थित होत असल्याचे मतदार संघातील दौऱ्या दरम्यान सांगितले. तसेच माझे मंत्री पदाचे कार्यकाळात झपाट्याने मतदारसंघाचा विकास होत असल्याचे जनतेला विश्वासाने पटवून देऊन पुन्हा निवडून देण्याची जनतेला साद घालत आहेत
Comments are closed.