Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मरेगाव जंगल परिसरात दोन वाघाचा वावर, शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली: दि. ९ , तालुक्यातील पोर्ला वन  परिक्षेत्रातील मरेगाव उपवनक्षेत्रात तीन वर्षापासून एका वाघाचा वावर आहे. पुन्हा दुसऱ्या वाघाची सदर क्षेत्रात एन्ट्री झाल्याने दौन वाघाचे दर्शन होत असल्याने जंगलालागताची शेती करणारे शेतकरी यामध्ये दहशतीचे वातावरण झालेले आहे. त्यामुळे शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उपरोक्त परिसर हा रांगी उपक्षेत्र लगतच्या जंगलाला लागून असल्याने या जंगलात वाघीनीसह दोन बच्छद्याच  वावर आहे. त्यामुळे या भागात वाघाच्या हल्याच्या घटना मध्ये वाढहोण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु असे असताना देखील  वनविभागाकडून लोकामध्ये  कुठल्याही प्रकारची जागृती करीत नाही. असा आरोप वनविभागावर करण्यात येत आहे.

Comments are closed.