Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

फिश फूड स्टॉल बंद केले म्हणुन सदा सरवणकरांवर कोळी महिला संतापली,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सध्या मुंबईतील माहीम मतदार संघात सदा सरवणकर व अमित ठाकरे कडून जोरदार प्रचार सुरु आहे त्यामुळे माहीम मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे विरुद्ध ठाकरे अशी बिग फाईट पाहायला मिळणार आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. सध्या या मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने संताप व्यक्त केला.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सदा सरवणकर एका कोळी महिलेशी संवाद साधताना दिसत आहेत. यात ती कोळी महिला माहीममध्ये फिश फूड स्टॉल लावण्यास बंदी घालण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन सदा सरवणकरांना प्रश्न विचारत आहेत. मात्र विचारलेल्या प्रश्नांची उत्तर न देता आल्याने ते माघारी परतल्याचे दिसत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.