Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलिसांनी केली दीड लाख रुपयांची दारू जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : स्थानिक पोलिस पथकाने सापळा रचून सुमारे ३ लाख ९० हजार रुपये किमतीचा माल जप्त केलेला आहे.

शहर पोलिसांच्या डीबी पथकाला शहरात दारू तस्करी बाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी मुरखळा गावाजवळ  सप्ला रचून  १ लाख ४० हजार रुपये किमतीची दारू व २ लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख ९० हजार रुपये किमतीचा माल जप्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदरची कारवाई  मुरखळा गावाजवळ गुरुवारी रात्री  करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पंचवटी नगर येथील लोकेश मडावी (२५) आणि बसेरा कॉलनी येथील वांजा कुळमेथे (३२) यांना ताब्यात घेतले. दारू तस्करी होणार असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या डीबी पथकाने मुरखळा गावाजवळ सापळा रचला. पोलिसांनी चारचाकी वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनात १ लाख ४० हजार रुपये किमतीचे देशी दारूचे ४० बॉक्स आढळून आले. पोलिसांनी कारवाई करून एपी २० एडब्ल्यू-३३६ – क्रमांकाची २ लाख ५० हजार रुपये किमतीची सुमो वाहन असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकचे धनंजय चौधरी, अविनाश लंजे, तुषार खोब्रागडे, राजेंद्र पुरी, स्वप्नील कुडावले, अतुल भैसारे, स्वदीप मेश्राम, वृक्षाली चव्हाण, सुजाता केली आहे. ठोंबरे यांनी केली

हे पण पहा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.