Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी पोलिसांकडून ५३ लाखाचा अवैध दारू मुद्देमाल नष्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : अहेरी पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली यांचे एकत्रित कारवाई मध्ये एकुण १७२ गुन्हयातील मुद्देमाल एकूण 53 लाख 65 हजार 393 रुपये किमतीचा सर्व भुजंगरापेठा, अहेरी येथील, मोकळ्या जागेत नष्ट करण्यात आला.

जप्त केलेली अवैध दारू खालील प्रमाणे 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१) देशी दारु ९० एम.एल. मापाच्या ३३,४५४ प्लॉस्टीक निपा.

२) विदेशी दारु ९० एम.एल. मापाच्या १६५ निपा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

३) विदेशी दारु १८० एम.एल. मापाच्या १६५ काचेची बाटल्या.

४) विदेशी दारु ३७५ एम.एल. मापाच्या ४५ बाटल्या.

५) विदेशी दारु ७५० एम.एल. मापाच्या २७७ बाटल्या.

६ ) विदेशी दारु १००० एम.एल. मापाच्या ६१ बाटल्या.

७) विदेशी दारु ०२ लिटर क्षमतेच्या १९३ बाटल्या.

८) बिअर ५०० एम.एल. मापाच्या २०८२ टिनाचे कॅन.

९) बिअर ६५० एम.एल. मापाच्या ९९२ बाटल्या.

एकूण 53 लाख 65 हजार 393 रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, गडचिरोली नीलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक, अहेरी सत्यसाई कार्तिक, उप विभागीय पोलीस अधिकारी,अहेरी अजय कोकाटे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षण हर्षल एकरे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश वळवी (अहेरी पोलीस ठाणे) ग.द. कुचेकर निरीक्षक(राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, गडचिरोली) शुभम चौधरी, उप निरीक्षक, (राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक गडचिरोली)  हेडमोहर पेंदाम व पोलीस स्टाफ यांनी दि. 18/08/2025 रोजी भुजंगरापेठा, अहेरी येथील, मोकळ्या जागेत पार पाडली.

Comments are closed.