Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना २९ जुलै रोजी सुटी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट तसेच ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडिया, इंद्रावती आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची तसेच नाले-नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांनाही ही सुटी लागू राहणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच लागू असलेल्या कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.